जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2025: कसे कराल अर्ज? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप ! Jilhadhikari Karyalay Bharti 2025

Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्वसन विभागात एक रिक्त पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी दिलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून इच्छुकांनी आपले अर्ज सादर करावेत.

भरती करणारा विभाग : ही भरती अपर जिल्हाधिकारी, पुणे यांच्यामार्फत जाहीर करण्यात आली आहे.

▪ पदाचे नाव : विधी अधिकारी (कंत्राटी पद्धतीने).

▪ शैक्षणिक पात्रता : पदाच्या गरजेनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. (कृपया अधिकृत जाहिरात वाचा.)

▪ मासिक वेतन/मानधन : एकूण मानधन रु. ८०,०००/- व त्यात दुरध्वनी व प्रवास भत्ता रु. ५,०००/- समाविष्ट असून, एकूण रु. ८५,०००/- प्रतिमाह देण्यात येईल.

▪ अर्ज करण्याची पद्धत : उमेदवार ऑफलाईन किंवा ई-मेलद्वारे अर्ज सादर करू शकतात.

▪ नोकरीचा कालावधी : ही भरती पूर्णतः 11 महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने राहील. संबंधित पदास शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही.

▪ आवश्यक पात्रता :

  1. उमेदवार एलएलबी किंवा एलएलएम पदवीधारक असावा.
  2. सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश किंवा तत्सम पदावर कार्यरत असलेले उमेदवार प्राधान्याने विचारात घेतले जातील.
  3. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर आणि सनदधारक असावा.
  4. वकील म्हणून किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  5. महसूल व पुनर्वसन कायदे, प्रशासनिक व सेवाविषयक कायद्यांचे ज्ञान आवश्यक आहे.
  6. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे कार्यक्षम ज्ञान असणे गरजेचे आहे.

▪ एकूण पदसंख्या : एक (1) रिक्त पद.

▪ कामाचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.

▪ अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 जून 2025 पर्यंत.

▪ अर्ज पाठवण्याचा पत्ता :
जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालय,
ए विंग, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय,
पुणे – 411001

▪ ई-मेल पत्ता : dropune@gmail.com

▪ अधिक माहितीकरिता : कृपया अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

✅ आवश्यक लिंक्स:

📄 PDF जाहिरात पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

📝 ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा

बजरंग पाटील हे naukri.naukrinewz.in या मराठी वेबसाइटचे संस्थापक आणि प्रमुख लेखक आहेत. त्यांना सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक लेखनाचा 5+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी हजारो वाचकांना भरती प्रक्रियेबाबत अचूक, सत्य आणि वेळेवर माहिती पुरवली आहे.

Leave a Comment