Assam Rifles Recruitment 2025 देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आसाम रायफल्सने विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली असून, अर्ज प्रक्रिया २० जून २०२५ पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २१ जुलै २०२५ पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात.
एकूण रिक्त पदे : ७९
रायफलमन/रायफलवुमन जनरल ड्युटी (पुरुष आणि महिला) – ६९ पदे
वॉरंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक (फक्त पुरुष) – ०१ पद
वॉरंट ऑफिसर ड्राफ्ट्समन (फक्त पुरुष) – ०१ पद
हवलदार एक्स-रे असिस्टंट (फक्त पुरुष) – ०१ पद
रायफलमन इलेक्ट्रिशियन (व्हेईकल मेकॅनिक) (फक्त पुरुष) – ०१ पद
रायफलमन व्हेईकल मेकॅनिक फिटर (फक्त पुरुष) – ०१ पद
रायफलमन प्लंबर (फक्त पुरुष) – ०१ पद
रायफलमन सफाई कर्मचारी (फक्त पुरुष) – ०४ पदे
शैक्षणिक पात्रता:
या भरतीसाठी उमेदवारांकडे किमान १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी संबंधित आयटीआय किंवा डिप्लोमा आवश्यक आहे:
रायफलमन/रायफलवुमन जनरल ड्युटी: १०वी उत्तीर्ण
ड्राफ्ट्समन: १२वी उत्तीर्ण आणि आर्किटेक्चरल असिस्टंटशिपमध्ये डिप्लोमा
रेडिओ मेकॅनिक, एक्स-रे असिस्टंट, व्हेईकल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, प्लंबर: संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय किंवा तांत्रिक डिप्लोमा आवश्यक
वयोमर्यादा:
- किमान वय: १८ वर्षे
- कमाल वय: २५ वर्षे
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू होईल.
निवड प्रक्रिया आणि वेतन:
या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी वेतनश्रेणीप्रमाणे पगार दिला जाईल. यासोबतच घरभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा, निवृत्तीवेतन योजना यांसारखे अनेक फायदेही मिळतील. देशाच्या सुरक्षेत योगदान देण्याची आणि प्रतिष्ठित पदावर काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे.
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी आसाम रायफल्सच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
टीप: अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै २०२५ आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घेऊन लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
अधिकृत संकेतस्थळ | assamrifles.gov.in |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लीक करा |