GMC Sambhaji Nagar Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध चतुर्थश्रेणी पदांच्या एकूण ३५७ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, ही संधी मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
भरती संस्था: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
एकूण पदसंख्या: 357
भरतीची पद्धत: थेट भरती (Direct Recruitment)
अर्ज प्रकार: ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख: ५ जून २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ जून २०२५
अधिकृत वेबसाईट: www.gmcaurangabad.com
कोणकोणती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीत खालील प्रकारची पदे समाविष्ट आहेत:
- आया
- माळी
- प्रयोगशाळा परिचर
- दाया
- बॉयलर चालक
- पाणक्या ड्रेसर
- नाभिक
- चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे
शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक पात्रता पदाच्या स्वरूपानुसार वेगळी आहे. काही पदांसाठी किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक असू शकते, तर काही ठिकाणी कौशल्य किंवा अनुभवाची गरज असू शकते.
वयोमर्यादा
- सामान्य प्रवर्ग (Open Category): ३८ वर्षे पर्यंत
- आरक्षित प्रवर्ग (Reserved): ४३ वर्षे पर्यंत
अर्ज शुल्क
प्रवर्ग | अर्ज शुल्क |
---|---|
खुला प्रवर्ग | ₹1000/- |
राखीव प्रवर्ग | ₹900/- |
अर्ज कसा करायचा?
- 🔗 ऑनलाईन अर्ज करा (५ जूनपासून सुरु)
- अर्ज करताना आपले वैयक्तिक व शैक्षणिक तपशील अचूक भरा.
- आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
- अर्ज फी ऑनलाइन पद्धतीने भरावी.
- अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा.
महत्वाच्या सूचना
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
- अर्जात कोणतीही माहिती अपूर्ण असल्यास तो अर्ज बाद करण्यात येईल.
- २४ जून २०२५ नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- निवड झाल्यानंतर उमेदवाराची मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
- भरतीशी संबंधित सर्व अधिकृत अपडेट्स www.gmcaurangabad.com वर प्रसिद्ध होतील.
महत्वाचे लिंक्स
जर तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटला असेल तर, तो इतर नोकरी शोधणाऱ्या मित्रमैत्रिणींशी जरूर शेअर करा.
सरकारी भरतीविषयी अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.