RRB रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 6180 पदांसाठी भरती | RRB Technician Recruitment 2025

RRB Technician Recruitment 2025 खास रेल्वेत सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) तंत्रज्ञ भरती 2025 अंतर्गत एकूण 6180 पदांची भरती जाहीर केली आहे.

यामध्ये तंत्रज्ञ ग्रेड-1 आणि तंत्रज्ञ ग्रेड-3 या दोन प्रमुख श्रेणींचा समावेश आहे. सध्या जाहीर केलेली ही पदसंख्या तात्पुरती असून, अंतिम अधिसूचनेत ही संख्या वाढण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केली आहे.

RRB Technician Recruitment 2025 पदांची संख्या

  • तंत्रज्ञ ग्रेड 1 (सिग्नल) :- 180 पदे
  • तंत्रज्ञ ग्रेड 3 :- 6000 पदे

RRB Technician Recruitment 2025 शैक्षणिक पात्रता :

तंत्रज्ञ ग्रेड 1 सिग्नलसाठी

उमेदवारांनी भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान किंवा इन्स्ट्रुमेंटेशन या विषयांपैकी कोणत्याही एकात B.Sc. पदवी मिळवलेली असावी, किंवा तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी वरील विषयांच्या कोणत्याही संयोजनात पूर्ण केलेला असावा.

तंत्रज्ञ ग्रेड 3 साठी

उमेदवारांनी फोर्जर अ‍ॅण्ड हीट ट्रीटर / फाउंड्रीमन / पॅटर्न मेकर / मोल्डर (रिफ्रॅक्टरी) या संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून ITI आणि मॅट्रिक/SSLC पूर्ण केलेले असावे. किंवा, मॅट्रिक/SSLC सह संबंधित ट्रेडमध्ये अ‍ॅप्रेंटिसशिपचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.

RRB Technician Recruitment 2025 वयोमर्यादा :

  • ग्रेड 1 साठी – 18 ते 36 वर्षे
  • ग्रेड 3 साठी – 18 ते 33 वर्षे
    (शासकीय नियमानुसार आरक्षित प्रवर्गासाठी वयातील सवलत लागू असेल.)

RRB Technician Recruitment 2025 परीक्षा शुल्क :

  • SC/ST/महिला/अपंग/माजी सैनिक/तृतीयपंथी/अल्पसंख्याक/ईडब्ल्यूएस उमेदवार – ₹250
  • सर्वसाधारण व इतर प्रवर्गातील उमेदवार – ₹500

RRB Technician Recruitment 2025 निवड प्रक्रिया :

  1. संगणक आधारित परीक्षा (CBT)
  2. कागदपत्रांची पडताळणी
  3. वैद्यकीय तपासणी

RRB Technician Recruitment 2025 पगार :

  • तंत्रज्ञ ग्रेड 1 (सिग्नल) – ₹29,200/-
  • तंत्रज्ञ ग्रेड 3 – ₹19,900/-
मूळ पीडीएफ जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्जयेथे पहा

RRB Technician Recruitment 2025 महत्वाच्या तारखा :

रेल्वेने जाहीर केलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अधिसूचना दिनांक 10 जून 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. मात्र, ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख आणि शेवटची तारीख लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाईल.

बजरंग पाटील हे naukri.naukrinewz.in या मराठी वेबसाइटचे संस्थापक आणि प्रमुख लेखक आहेत. त्यांना सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक लेखनाचा 5+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी हजारो वाचकांना भरती प्रक्रियेबाबत अचूक, सत्य आणि वेळेवर माहिती पुरवली आहे.

Leave a Comment